प्रिय जोन डो,
आज मी आले इथे.. आल्या आल्या खिडकी उघडली. कधीतरी ती खिडकी उघडणार होतीच, उघडायला हवीच होती... आठवतं का कधी बंद केली होती ते? खिडकी उघडल्यावर बाहेरच्या छज्ज्यावरची कबुतरं फडफडली.. सुखलेल्या, काड्या झालेल्या २-३ गुलाबाच्या कुंड्या आहेत तश्याच.. धुळीत , कबुतरांच्या घाणीत बरबटलेल्या... आपण एकदा लाईट गेल्यावर मेणबत्तीचं मेण सांडवून आपलं नाव लिहिलं होतं खिडकीत आठवतंय? ते आहे अजून मस्तपैकी .. धुळीमध्ये अजून उठून दिसतं आहे.. माहित्ये तू लगेच विचारशील "बसून नाही दिसते का?".. असे किती पकाऊ जोक मारले असशील ना ह्या खिडकीत बसून.. आणि मीही कितीदा "फेकून दिन हा तुला खिडकीतून ..अजून बडबड केलीस तर" अशी धमकी दिली असेन..
शेठ काकूंनी लगेच चहा आणि त्यांच्या कमी साखरेच्या बदामी कुकीज आणून दिल्या.. बसणार होत्या गप्पा मारायला आणि गेल्या २ वर्षातल्या सोसायटीतल्या "महत्वाच्या घडामोडी" सांगायला..पण तितक्यात शेखर आला .. अरे तू विश्वास नाही ठेवणार.. शेखर २ वर्षात २ फुट वाढला असेल..मिश्या ठेवल्यात आता..सायंस घेतलं आहे.. तू अभ्यास घ्यायचास त्याचा ,अभ्यास कमी आणि पोकेमोनच्या चर्चा जास्त चालायच्या... आता खुपच वेगळा वाटला रे.. आपल्या खिडकीची काच फोडली होती त्याने क्रिकेट खेळताना .. आणि आपण ती परत कधी बसव्लीच्च नाही आपल्या आळसाला "कवडसा मस्त दिसतो" हे नाव देऊन.. आत्ता त्या काचेला लागलेला पेपर पिवळा झालाय.. तुला आवडत नाही तसा.. काढूनच टाकेन आता आणि पतंगी कागद नक्षी कापून लावेन नंतर.. रंगीत नक्षीदार कवडसा पडेल म्हणजे..
चहा पित एकटीच बसले मग खिडकीत.. उद्या जाऊन पडदा घेऊन येईन म्हणते... आठवतं? आपण भुलेश्वर पालथं घातलं होतं.. आपल्याला घरी बनवायचे होते पडदे.. बनवलेही होतेच कि आपण.. आकाशी नेटवर काचेच्या टिकल्या आणि तुझे आवडते लाल भडक पडदे आणि त्यावरची पांढरी तूच काढलेली नक्षी.. तसं पडद्यांचा जास्त उपयोग नव्हताच झाला कधी.. सताड उघडी असायची ना खिडकी.. समोरच्या बिल्डिंगमधल्या ६ पैकी ४ खिडक्या बंद आहेत आज..माधुरी दीक्षितच्या खिडकीत बाळाचे कपडे वाळत घातलेले दिसतायत. अब्राहम लिंकनच्या खिडकीत नेहमीप्रमाणे त्याचे आतले कपडे वाळत घातलेत. आजी-आजोबांची खिडकी बंदच असावी बरेच दिवस कारण कबुतरांची कोलनी झाल्ये तिथे..वरच्या मजल्यावर डावीकडे कोण राहायचं रे? अन्ना कि वझलवार? मला ना आठवतच नाहीये नक्की..दोघं वर राहायचे इतकं माहित्ये. त्या रंग दे बसंतीवाल्यांकडे मगाशी मुलगी होती एक ..
ही सगळी माणसं कोण आहेत काय माहीत न खर्या-खुर्या आयुष्यात? आपण इथे राहत असताना किती गोष्टी बनवल्या ह्यांच्या.. सुंदर दिसते, गोरी आहे, एकदा मराठी बोलताना ऐकलं म्हणून ती नववधू आपली माधुरी दिक्षित झाली.. बारीक, दाढीवाला अमेरिकेच्या झेंड्याची चड्डी घालतो म्हणून अब्राहम लिंकन झाला..पोलिसात असणारा वझलवार झाला.. लुंगीमुळे अन्ना बनला.. थोराड दिसणारी, कदाचित नापास होणारी कॉलेज न सोडणारी मुलं रंग दे बसंती झाली.. आजी-आजोबा मात्र तेच राहिले.. चहा पितानाचा आपला आवडता टाईमपास त्याच्या आयुष्यात काय होतं आहे हे ठरवायचा असायचा .. आपण खर तर ३ वर्षापूर्वीच माधुरीला प्रेग्नंट घोषित केलं होतं रे.. पण आत्ता बाळाचे कपडे दिसतायत..अन्नाचा लिंकनच्या बायकोवर डोळा आहे हे तुझं ठाम मत होतं..तशी ती होती ढिंच्याकच, मी तेव्हा मान्य नाही केलं कधी.. पण आता म्हणायला काय जात? तू तश्या बायकांमध्ये रुची ठेवत नाहीस हे कळलं आहे ना आता..
१०० रुपयांचं घासाघीस करून २० रुपयात आणलेलं छोटेखानी झुंबर कुठे आहे रे? ते मस्त दिसायचं खिडकीत.. wind chyme का नाही आवडायचं रे तुला? किती मस्त किंकिण असते त्याची.. झाडही नाही लावू द्यायचास तू मला जास्तीच.. फक्त गुलाब लावायचं असायचं तुला..उगाच काहीही ना? पाउस प्यायला लावला होतास खिडकीत उभं राहून..फुटलेल्या काचेतून बरोबर चंद्र समोर येईल तसं झोपायचं असायचं तुला तो प्रकाश उघड्या अंगावर पाडत.. दिवाळीत सोडलेल्या दिव्यांच्या माळा Christmas झाल्यावर उतरवाय्चास तू.. माळा बघून चुकून santa clause येऊ शकतो म्हणून दुध आणि कुकीज ठेवल्या होत्यास.. मी मग रात्री खाली उतरून एक गिफ्ट आणून ठेवलं.. मला सकाळ आवडायची इथली, आणि तुला संध्याकाळ..तसा cliche माणूस होतास तू कायमच.. तुझे अर्धे प्रोफाईल फोटो ह्याच खिडकीतले असतील ना रे? माझेही किती फोटो काढले असशील तू इथे.. त्यांना black and white करून अपलोड करायचे मग.. आणि अगणित सावल्यांचे खेळ केले असतील ना आपण..
तू माझ्याआधी घरी यायचास .. मला उशीर व्हायला लागला कि खिडकीत बसून राहाय्चास गेटकडे बघत.. आता आंबा मोठा झालाय खालचा.. गेट नाही दिसत हा..मला शेठ काकू कायम म्हणायच्या "नवरा मिळत नाही हो असा बायकोआधी घरी येऊन तिची वाट बघत बसणारा".. मी मनातल्या मनात म्हणायचे "मलातरी कुठे मिळाला आहे".. सगळ्यांना नवरा-बायकोच वाटायचो आपण.. आणि ह्या सोसायटीत राहायला मिळावं म्हणून आपणही तसंच दाखवत होतो.. आता का खोटं बोला? मला आपलं लग्न पुढे-मागे होणारच ह्याची खात्रीच होती.. म्हणून तर live in साठी एका पायावर तयार झाले होते..तेव्हा कुठे माहीत होतं खिडकीत उभा राहून तू फोनवर बोलतोस ते सगळे फोन कामाचे नसतात म्हणून.. खिडकीत तुला बिलगून फोटो काढताना हे फक्त फोटोपर्यंतच आहे हे कुठे माहीत होतं? १-२ दिवस नसले कि खिडकीत रचून ठेवलेल्या बाटल्या आवरताना वाटायचं माझ्या जुदाईत प्यायलास.. तेव्हा कुठे माहीत होतं तुला company असायची ते?
तुझ्या आताच्या घरात आहे का रे आपल्यासारखी खिडकी? ती तुला खिडकी हवी तशी सजवू देते का? कुंड्या ठेवल्यात तुम्ही? कोणती झाडं आहेत? चहा पिता का खिडकीत बसून? काच फुटल्यावर तशीच ठेवू देईल का ती? तुमच्या खिडकीत बाळाचे कपडे वाळत घालायची वेळ आली का? तुम्ही बनवता का समोरच्या घरामधल्या गोष्टी? तिला तू दात घासत खिडकीत आल्याचं चालतं का, दाढी केल्याच चालतं खिडकीत ? तू तिची वाट बघतोस? कि ती तुझी? चंद्र दिसतो का? उन येतं का? असे एक हजार प्रश्न आहेत अजून.. तू तिच्यापाठी गेल्यावर मीपण सोडलं होतं हे घर.. आज परत मुंबईत आल्यावर आले इथे.. आता काही दिवस रोज विचारेन असेच अनेक प्रश्न.. संपवून टाकेन विचारून एकदाचे.. अश्याच कागदावर लिहेन ते.. मग तुझा आवडता प्रकार करेन.. ह्या कागदांचे बारीक बारीक तुकडे करून खिडकीतून बाहेर उधळेन.. ठिणग्यान्सारखे चमकतील मग ते कपटे.. त्यातच जराशी जळेन आणि मग खिडकी बंद करून टाकेन..
-जेन रो
Monday, April 2, 2012
Sunday, March 25, 2012
नीट बोल गाढवा..
(गुढी पाडव्याला लिहिली होती.. आज पब्लिश केली)
आज गुढी पाडवा आहे.. माझ्या ह्या सणाबद्दल तश्या विशेष काही भावना नाहीयेत.. म्हणजे मला दिवाळी लै अशी नाही आवडत.. गणपती प्रचंड आवडतो.. दसरा चांगला असतो.. ख्रिसमस टीव्हीवर आणि इंग्लिश फिल्म्समध्ये आणि ठाण्यात चरई मध्ये जाम आवडतो.. तसं गुढी पाडव्याबद्ल काहीच भावना नाहीयेत.. त्यामुळे ही पोस्ट गुढी पाडव्याबद्दल नाहीये. ही पोस्ट अशीच जनरल "आता ह्यावर्षी तरी लिहायला हवं आणि सुरुवात आजपासूनच करायला हवी" म्हणून लिहिली गेलेली आहे. आणि as usual सुचत वगैरे नाहीत विषय म्हणून सुरुवात आपण गुढी पाडव्याने केलेली आहे.
मगाशी माझ्या आईने असं उगाच पुऱ्या लाटत असताना विचारलं.. "आज गुढी उभारतात ना? मग आजच्या दिवसाला गुढी 'पाडवा' का म्हणतात?" मग मी आणि दीपिकाने ऐकू न आल्यासारखं दाखवून "एका लग्नाची दुसरी गोष्ट' चे आढावे एपिसोड्सबद्दल बोलणं सुरु केलं..मला ना ती सिरीयल बघताना भीती वाटते जाम.. २ कारणं आहेत..
१. कधी टचकन डोळ्यात पाणी येईल सांगता येत नाही.. मग उगाच लाजायला होतं
२. ही सिरीयल ताणली जायची भीती वाटते... ही सिरीयल प्लीज प्लीज जास्त ताणू नको देत.. लोकं नावं ठेवायला लागेपर्यंत नको चालवू देत.. हुरहूर लागून संपवू देत..
ते चार दिवस सासूचे प्रकार काय डेंजर आहे ना .. अजूनही लोकं बघतात आणि ती सिरीयल.. माझ्या ओळखीतले एक आजोबा आहेत ते चा.दि.सा ची वेळ झाली की आजीला बोलवतात "अगं सासूची वेळ झाली..सासू लावायचं आहे ना" ते क्रिकेट सोडूनपण चा.दि.सा बघतात.
गुढी पाडवा ... नीट बोल गाढवा
सुपारी.. तुझं लग्न दुपारी
सांग... तुझी दाढी-मिशी लांब
काय.. तुझ्या नाकात दोन पाय.. तुझ्या सासुच नाव काय? खाली डोकं वर पाय..
म्हण्जे... वाघाचे पंजे.. कुत्र्याचे कान अन् उंटाची मान..
अजून काय काय असायचं नं ह्या टाईपमधलं.. "तुझ्या नाकात दोन पाय" हे माझ्यामते सर्वात गलिच्छ वाक्य होतं.. माझ्या नाकात अजूनही हुळहूळतं हे ऐकल्यावर.. हां.. आणि ते ऐकून तोंडात घाण चव येते "दे टाळी.. खा पोळी.. दे विडा.. खा किडा.."
ह्या सगळ्यावरून खेळतानाची लहानपणाची वाक्यं आठवली.. आमचे खेळ पण डेंजर असायचे सुट्टीतले..
१. झुंजुमुंजू: ह्या खेळात दोन बाजूना माती असते आणि मधे राज्य घेणारा माणूस.. आणि एका बाजूने दुसऱ्या बाजूला राज्य घेणाऱ्या माणसाला चुकवून जाऊन परत यायचं.. बरं, तुम्ही " झुंजुमुंजू- झुंजुमुंजू" म्हणत जात असाल तर राज्य घेणारा माणूस तुम्हांला पकडू शकत नाही.. पण अट अशीये की तुम्ही एकाच ट्रीपमध्ये झुंजुमुंजू वापरू शकता.. म्हणजे जाताना वापरलं असेल तर येताना वापरू शकत नाही..
२. इंदिप्ना पंचरसी: हा मंत्र माझ्या भावाने काढला होता.. तर ह्या खेळांत आम्ही सगळे भिडू आमच्या पडवीतल्या झोपाळ्यावर बसायचो.. राज्य घेणारा माणूस बाहेर उभा असायचा.. त्याचा aim हा असायचा की in any case झोपाळ्यावर चढायचं आणि झोपाळवरच्या भिडूंनी त्याला चढू द्यायचं नाही.. आणि हा खेळ चालू असेपर्यंत "इंदिप्ना पंचरसी-इंदिप्ना पंचरसी-इंदिप्ना पंचरसी" हा मंत्र म्हणत बसायचा.. जो थांबेल त्यावर पुढचं राज्य..
३. खांब-खांब-खांबोरी: हा अंगणात मांडव असताना खेळायचा खेळ.. मांडवाच्या खांबाला धरून भिडू उभे राहतात.. राज्य घेणारा माणूस मधोमध उभा राहतो.. आता त्याला चुकवत बाकीच्यांनी खांब अदला-बदली करायचे असतात.. राज्य घेणाऱ्याने मग खांबांवर लक्ष देता देता प्रत्येक खांबाजवळ जाऊन म्हणायचं असतं
राज्य देणारा: फफम्मबाई ताक दे..
खांबावरचा: डेरा फुटला.. उद्या ये..
४. प्रोजेक्ट चंद्रभागा: आमच्या घरामागे एक पाण्याचा पाट वाहतो. उन्हाळ्यात पाण्याचा फोर्स कमी झाला कि पाणी यायचं बंद व्हायचं .. मग मी आणि माझा भाऊ तो पाट स्वच्छ करायचा खेळ खेळायचो. त्याला आम्ही प्रोजेक्ट चंद्रभागा म्हणायचो.. आम्ही pretend करायचो कि आम्ही कोणीतरी मोठे वैज्ञानिक आहोत आणि पाट म्हणजे चंद्रभागा नदी आहे आणि तिला स्वच्छ करायची जबाबदारी आमच्यावर आहे.. ह्यात actually मंत्र वगैरे नव्हते पण पूर्णवेळ आम्ही मोठमोठ्या योजना आखायचो, बातम्या द्यायचो, मग मधेच पूर यायचा तेंव्हा नदीतल्या मुंग्यांना वाचवायचो.. etc etc.
५. नोटे आटे काटे ठोम: (not at home) आम्ही सगळी भावंड, आत्या वगैरे पडवीत बसून हा खेळ खेळायला लागलो कि अख्खी दुपार मस्त जायची.. आपल्याकडे मागितलेला पत्ता आपल्याकडे नसल्यावर "नोटे आटे काटे ठोम" म्हणायला तर असला आनंद व्हायचा..आणि मग लगेच "आता तू.. मला दे.. " म्हणत त्या माणसाने घेतलेले सगळे पत्ते मागायचे..अजून मज्जा यायची ते इतरांकडचे पत्ते पाठ करण्यात "सुजय..दश्शी .. नववी.. आरती एक्का, दीपिका राजा, गोटू" तरी माझा एक लहान भाऊ त्याच्याकडे असलेलं पान दुसऱ्याकडे मागितलं कि स्वतःच ओरडायचा "नोटे आटे काटे ठोम"
६. रुपांझेल रुपांझेल: आमच्याकडे एक तिरकं नारळाचं झाड होतं, त्यावर बर्यापैकी वर चढता यायचं.. आम्ही मग त्यावर चढून rapunzelची गोष्ट enact करायचो.. केसांच्या ठिकाणी एखादी वाळलेली फांदी वगैरे असायची.. सुजयला शाळेत तिचं नाव रुपांझेल सांगितलं होतं आणि तिला प्रेमाने रुपा म्हणायचे ते लोक.. मग आम्हीपण कोणीतरी खाली उभं राहून "रुपा.. रुपा तुझे सोन्यासारखे केस सोडतेस का ग खाली?" म्हणूनमग मराठीतून खेळायचो सगळा खेळ.. मग चेटकीण आणि राजकुमाराच युद्ध म्हणजे आमच्यात मारामाऱ्या आणि रडारड होईपर्यंत जायचं..
आत्ता हे लिहीत असताना मंचची "शोर ना मचाया तो मजा नही आया" जाहिरात आठवली.. खरंय किती.. आता पटली ती जाहिरात.. किती आवाज करायचो आम्ही खेळताना .. खेळायच्या आधी सुटताना तर अजून विचित्र काय काय म्हणायचो .. "इनि मिनी अल्कोसा.. टीप टोप नाकोबा.. नाकोबा का बकाबू.. फ्रांस".. हे फ्रेंच असावं कदाचित.. म्हणजे आम्हाला तरी वाटायचं आणि शेवटी फ्रांस येतं.. फ्रांस ज्यावर येतं तो सुटतो..
"आटली बाटली फुटली" हे मात्र माझं सर्वात नावडतं वाक्य.. लपाछपीमध्ये राज्य आलेलं कोणालाच आवडत नसेल आणि त्यात चुकीच्या माणसाचा धप्पा केल्यावर "आटली बाटली फुटली" होणं किती वाईट ना..पुण्यात काही लोक ह्याला "अंड फुटलं" म्हणतात .. पुण्यात generalच कशालाही काहीपण म्हणतात... "आटली बाटली फुटली" ची मला कायमच भीती वाटायची.. अजूनही वाटत असतेच.. तेव्हा राज्य लपाछपीपुरतं होतं आता "इनि मिनी" न करताही राज्य कायमच असतं.. आणि दिसणाऱ्या माणसाच्या आत नक्की कसा माणूस लपलाय हे अजूनही शोधता नाही येत मला.. आपण काहीतरी बोलून जायचो आणि समोरच्याने "आटली बाटली फुटली" करायचं.. ह्या भीतीने हजारो गोष्टी बोलायच्या टाळल्या आहेत मी.. 'नोटे आटे काटे ठोम" मधल्यासारखं मनातल्या मनात त्या गोष्टी घोळवत बसते मग.. "इंदिप्ना पंचरसि" आणि "झुंजुमुंजू" सारखे मंत्र शोधत बसते मग.. जरा risk घ्यायला नको.. पण मग आज सकाळी उठल्यावर स्वतःच स्वतःला म्हणून घेतलं.. "आज आहे गुढी पाडवा.. आता तरी नीट बोल..वाग अन् खेळ गं गाढवा"

Friday, December 30, 2011
ओपा...
फेलिक्स आणि कायरा जरा काळजीतच बसून होते. संध्याकाळ झाली तरी दिवे लावायचे अजून लक्षात नव्हतं आलं दोघांना..
"काय होणार आता?" कायरा तिचे नाजुकसे हात गोऱ्या हनुवटीवर ठेवत म्हणाली..
फेलिक्सने डोळे उघडले आणि म्हणाला.. "पार्टी करावी लागणार.."
कायाराने तिच्या शेल्फमध्ये ठेवलेल्या काचेच्या डायनर सेटकडे पाहिलं.. बाहेरून येणाऱ्या नारिंगी उजेडात तिच्या काचेच्या प्लेट्सच्या कडा चमकत होत्या.. " ओह थेयोश मो"
क्रकोझिया देशातल्या पौद् गावात फेलिक्स आणि कायरा राहत होते.. ईस्ट युरोपातला त्यांचा हा छोटा देश वेगवेगळ्या प्राचीन रुढी-परंपरा जवळ बाळगून आहे.. त्यांच्यातलीच एक परंपरा म्हणजे पार्टीनंतर जेवणाच्या प्लेट्स फोडणं.. कदाचित ग्रीसमधून ही परंपरा इथे आली असावी.. ही परंपरा का आली असावी ह्याला बरीच कारणं आहेत... कदाचित भारतात मातीचे कुल्हड वापरून टाकून देतात त्याप्रमाणे त्या प्लेट्स परत वापरू नयेत म्हणून असेल.. काही लोक म्हणतात की दुष्टआत्मे दूर रहावे म्हणून असं करतात.. कदाचित आनंदाला नजर लागू नये म्हणूनही असेल.. किंवा केह्फी, म्हणजे ग्रीकमध्ये उन्मत्त आनंद.. त्याचा उच्चारही इंग्लिशमधल्या carefree आणि आपल्या कैफीसारखा होतो.. इतका आनंद व्हावा की तो दाखवण्यात मग कुठेही अडताचं येऊ नये..
क्रकोझीयात मात्र पार्टी चांगली झाली.. जेवण रुचकर असेल तरच प्लेट्स फोडल्या जातात.. पार्टीत रिझोगालो, बकलावो, रेवानीसारखी डेसर्ट डिश सर्व्ह झाली की घरातल्या बाईचे कान टवकारले जातात.. खळ.. आवाज येऊन कोणी ओपा म्हणून ओरडलं की बाईच्या डोळ्यात पाणी येतं.. आपलं जेवण लोकाना आवडलं, आता ४ दिवस आपल्या पार्टीची चर्चा होणार ह्याचा आनंद आणि पार्टीच्या प्लेट्सचा चुरा होत असतानाचा त्रास... "ओह थेयोश मो"..
फेलिक्स एका सरकारी कार्यालयात जमिनीच्या कागदपत्रांची कामं करायला होता.. ह्या कामामुळे बिझीनेसमधल्या वेगवेगळ्या गोष्टी त्याला कळत होत्या, नवनवीन ओळखी होत होत्या.. त्यालाही बिझिनेसमध्ये रस वाटायला लागला.. तसंही त्याच्या कमी पगारात महिनाभर घर चालवायचा कायाराला कंटाळा आला होता.. ती कधीपासून त्याच्या मागे लागली होती.. "नोकरी सोड.. बिझिनेस कर.. एकदम श्रीमंत होऊ.. मग आपली मुलं चांगल्या शाळेत जातील..आपण बंगल्यात राहू.." कायराची ही यादी सुरु झाली की तिला थांबवणं कठीण व्हायचं आणि फेलिक्स फक्त खिडकीबाहेरच्या झाडाकडे बघत राहायचा.. फेलिक्सने बिझीनेस्ची तयारी सुरु केली.. जमिनींच्याचं व्यवहारात उतरायचं त्याने ठरवलं होतं.. तयारी पूर्ण झाल्यावर त्याने नोकरीचा राजीनामाही दिला..
ज्या दिवशी त्याने राजीनामा दिला त्यादिवशी संपूर्ण दिवस रेडियोवर क्रकोझियामध्ये आलेल्या महागाईच्या लाटेबद्दल चर्चा-महाचर्चा चालू होत्या..
फेलीक्सचा अंदाज अंमळ चुकलाच होता.. त्याने केलेलं आर्थिक नियोजन फसलं होतं.. आणि त्यामुळे कायराचंही बिनसलं होतं.. तिने पाहिलेल्या मोठ्या स्वप्नांना मोठ्या किमतीची पण फाईनप्रिंट लेबल असतात हे तिला आता लक्षात यायला लागलं.. बिझिनेसमध्ये उतरायचं म्हणजे सतत पार्ट्या करणं आलंच असं कायराच्या आईने तिला सांगितलं होतं.. आणि आता फेलिक्सही तेच म्हणाला.. "पार्टी".. साधीसुधी पार्टी नाही.. क्रकोझीयन पार्टी.. घरातली माणसं जीव ओततात ह्या पार्टीत.. अपेटायझर ते डेसर्ट .. सगळं परफेक्ट पाहिजे.. पडदे- टेबल क्लॉथ सगळं सारख्या रंगसंगतीत हवं.. आणि घरात पार्टी म्हणजे कायराने सुंदर दिसायला हवं.. तिचा ठेवणीतला ड्रेस खास धुवून घ्यायला हवा.. परफ्युम, रूज, लिपस्टिक... सकाळी किचनच्या जबाबदाऱ्या आटोपल्या की दुपारीच जाऊन सलोनमधून हेअरस्टाईल करायला हवी.. मग घरी आल्यावर सलाडची तयारी.. ड्रिंक्स.. फायनल बेकिंग.. सजावट आणि सर्विंग.. हे सगळं नुसतं अचूक नाही तर उत्तम असायला हवं.. का? पार्टी संपल्यावर "ओपा!" म्हणून ओरडायला हवेत ना सगळे? तिचा काचेचा डायनर सेट फुटायला नको?
फेलिक्स तिच्याजवळ गेला.. तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला.. "ओह थेयोश मो.. त्या काचेच्या सेट्पायी तुला ही पार्टी नकोय? अगं पार्टी चांगली झाली.. अजून बोलणी झाली.. तर बिझिनेस चांगला सुरु होईल.. मग असे हजार सेट विकत घेऊन देईन तुला.."
"फिल.. तुला आठवत नसेल तर हा सेट तुझ्याच आईने दिलाय मला लग्नाची भेट म्हणून.. ५६ पिसचा सेट आहे.. अजून एकदाही वापरला नाहीये आपण"
"आईने काय सांगितलं होतं? आठवतं आहे का तुला कायरा? हे सौंदर्य घरा-दारांत पसरू दे.. ओपा होईल तेव्हा घरा-दारांत.."
"बास.. विचारही नाही करू शकत मी फिल.. पण तू म्हणतोयस की बिझिनेससाठी करावंच लागेल तर.. पार्टीआधीच नवीन क्रोकरी घेतली तर?
"कायरा.. कायरा.. खरंच नाही का गं समजते तुला? तू किती आवडतेस मला.. तुलाच खुश ठेवायचं आहे मला आणि म्हणूनच बिझिनेस करतोय ना मी.. मी पहिल्या बिझिनेस डीलमधून तुला ह्याहून सुंदर सेट घेऊन देईन.."
कायरा कशीबशी तयार झाली.. मेजवानीची तारीख ठरली.. गावातल्या ठराविक मोठ्या घरात बोलावणी गेली.. आईने कायराला समजावून ठेवलं होतं.. पार्टी चांगली झाली तर चांगली कामं मिळतील.. ओपा झालं की चांगलं भाग्य उजळेल..तरीही कायरा अजून विचारातच होती.. काचेच्या प्लेट्सकडे बघत बसली होती..
पार्टीचा दिवस उजाडला.. सकाळपासून कायरा मरमरून काम करत होती.. फेलिक्सने सजावटीची जबाबदारी उचलली होती.. तोही सगळं परफेक्ट करण्यात गुंतला होता.. कायरा सलोनमधून आली तेव्हाचं थोडावेळ फेलिक्स थांबला.. हिमगौरीसारखी सुंदर दिसत होती कायरा.. नवर्याच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून तीही सुखावली.. "फिल.. तुझ्या ह्या एका स्माईल साठी माझ्या काचेचा संपूर्ण सेट कुर्बान आहे".. असं म्हणत कायरा पुढच्या तयारीला लागली.. हिच्या डोक्यात अजूनही तो काचेचा सेट आहे? ह्या विचारात फेलिक्स तिच्याकडे पाहात राहिला...
.."जेवण रुचकर असायला हवं.. पण त्याहून महत्वाचं आहे लोकांशी बोलणं.. जेवणावर खुश होऊन काम मिळणार नाहीये तर त्यांना बिझिनेससाठी पटवून काम येणारे.. पार्टी चांगली होत्ये ना, तेवढं बास आहे.. एखादा पदार्थ जरा वर-खाली झाला तर काय हरकत आहे? ओपा तर टाळता येईल..."असा विचार करत ग्राटीनमध्ये मीठ पडत होतं..
..
फेलिक्स आलेल्या पाहुण्यांशी बोलत होता.. कायरा सर्व्ह करण्यात गुंग होती.. पण तिच्या गालावरची लाली आज खुलत नव्हती.. "ओपा झाल्यावर बिझिनेस डील मिळेलही.. पण त्यानंतर किती दिवस जातील नवीन डायनर सेट येण्यात?"
डेसर्ट सर्व्ह झाल्यावर कायरा बावरलेली दिसायला लागली..तिची नजर सतत फेलिक्सकडे जायला लागली.. फेलीक्सने तिच्याकडे बघितल्यावर मात्र ती नजर चुकवत होती.. ती अचानक कोपर्यात येऊन उभी राहिली.. आता जे होईल त्याला तोंड कसं द्यायचं ह्याचा विचार करताना तिच्या डोळ्यांत पाणी आलं.. तेवढ्यात तिच्याजवळ फेलिक्स येऊन उभा राहिला.. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं.. तिच्या डोळ्यातलं पाणी त्याने हलकेच पुसलं आणि थोडंस हसला.. तिने त्याचा हात धरला. आणि दोघं एकत्रच म्हणाली... "ओपा नाही होणार.."
" सॉरी.. प्लेट्सच्या मोहापायी मी असं केलं.. पण मला विश्वास आहे तुला बिझिनेस डील मिळेलच.. ग्राटीनमध्ये मी मीठ घातलंचं नाही.. "
फेलिक्स तिचा हात सोडवत तिच्याकडे बघायला लागला.. आणि तितक्यात मागून आवाज आला...
खळ..खळाळ..
"ओपा!"... "ओपा!"

Monday, December 12, 2011
कारण...
"तेजू .. लिही की गं काहीतरी आता" हे वाक्य हजारदा ऐकून झालं आता तुझ्याकडून.. आणि तरीही ह्या तेजुत काही फरक पडेना..
"अरे.. झोपच लागून गेली.."
"हो ना.. लिहिणारे.. लिहायचं आहे काहीतरी"
"मला आज ट्रेनमध्ये भन्नाट सुचलं होतं.. तेव्हा गर्दी होती जाम, नोट नाही करता आलं.. म्हणजे मी नेहमी करते असं नाही .. पण नाही जमलं.. आणि आता नेमकं आठवत नाहीये"
"च्यायला.. आज नक्कीचं.. लिहिणारच.. होतेच.. पण शनिवार ना.. लाईट गेले..आणि laptopचं charging संपलं होतं"
" वेळ? तो काय असतो विचारू नको.. शिल्लकच नाहीये माझ्याकडे आता अजिबात.."
" हां.. लिहायचं म्हणत होते मी गेल्या आठवड्यात पण ना मला सगळं असं जरा लहानपणातलं आणि काही कॉलेजमध्ये घडलेलं आठवत होतं.. पण आधीचं लोकांना वाटतं मी काही जमत नाही की rectrospective and nostalgic काहीतरी लिहिते.. म्हणजे ते खपतंच.. सो नाही लिहिलं"
" मी लिहिलं आहे की.. नाही दाखवणारे पण आत्ताच.."
"प्रायव्हेट ब्लॉगवर टाकलं आहे की.. ओह.. तू आहेस का तो वाचायला?.. तिथे टाकलं आहे म्हणजे ड्राफ्टमध्ये ठेवून दिलं आहे"
"अरे यु वोन्ट बिलिव्ह.. ६ पोस्ट अर्ध्या लिहून राहिल्यात माझ्याकडे.. हल्ली ना... काय सांगू आता तुला.."
"दिवाळी होती ना.."
"अरे परीक्षा आल्या.. जाम काम होतं"
"dilly-dallier?? मी? आईला विचार माझ्या.. किती काम करते ते.. काल लसूनपण सोलून दिली तिला.."
"हल्ली कोण लिहितं तसंही ब्लॉग? कमीच झालंय एकुणात"
"अंगठा दुखत होता.."
"इतकी दमले ना दिवसभर... "
"प्रवासात खूप वेळ जातो.. नाही होत मग काही दुसरं करून"
" आता आम्ही नोकरदार माणसं.. दिवसभर, चाकोरीचे खरडून कागद.. सहीस पाठवतो.. पाहिलसं? हल्ली स्वतः बोलायची वाक्यंही सुचेना झालीत.."
"आज ना मी मेथी- कोर्नची भाजी केली.."
"नेट डाऊन होतं"
"LAN card गेलं आहे"
" I am only human.. sometimes I procrastinate.."
"हल्ली ब्लॉगवर टाकण्यासारखं नाही सुचतं मला काही.."
"मला विचार.. तुझं काय? तू कधी लिहीणारेस? आं?"
"ऑनलाईन आले की मेल्सं आणि एफबीवर इतका वेळ जातो ना.."
"मुडच नव्हता.."
" हरिनाम सप्ताह चालू होता मागे देवळात.. म्हणजे मी नव्हते जात.. पण आवाजामुळे नाही लिहिलं"
"करते मी काम अधेमध्ये.. मग लिहिणं नाही होतं"
" वातावरण निर्मिती नाही होत लिहायची माझ्याकडे"
"घड्याळात वाजला एक .. मी ट्राय केला नवा केक... त्याची विल्हेवाट लावण्यात एक तास गेला .. मी नाही ब्लॉग लिहिला .."
"घड्याळ्यात वाजले दोन.. होणाऱ्या नवर्याचा आला फोन.. फोनवर बोलण्यात एक तास गेला.. मी नाही ब्लॉग लिहिला"
"घड्याळात वाजले तीन... कॉलेजमध्ये घडला सीन.. गॉसिप करण्यात एक तास गेला..मी नाही ब्लॉग लिहिला"
"घड्याळात वाजले चार.. नं कर्त्याचा वार शनिवार .. पुढची ओळ सुचण्यात एक तास गेला .. मी नाही ब्लॉग लिहिला"
"घड्याळात वाजले पाच.. दीपिका करते माझा जाच.. तिलाच बदडण्यात एक तास गेला.. मी नाही ब्लॉग लिहिला"
"घड्याळात वाजले सहा.. वाट पाहिली वाजायची दहा.. दहा वाजण्यात बराच वेळ गेला... मी नाही ब्लॉग लिहिला.."
"घड्याळात वाजले मग दहा.. मला हवा होता चहा.. उतू गेलेलं दुध पुसण्यात एक तास गेला... मी नाही ब्लॉग लिहिला"
"घड्याळात वाजले अकरा.. हल्ली लागत नाही MTV बकरा... फालतू यमकं जुळवण्यात एक तास गेला.. मी नाही ब्लॉग लिहिला"
"घड्याळात वाजले बारा..ब्लॉग लिहून झाला सारा... अपलोड करण्यात वेळ नाही गेला.. मी हा ब्लॉग लिहिला"
श्या.. आता ही पोस्ट ब्लॉगवर खाली जाईपर्यंत लवकर काहीतरी लिहीत राहायला हवं..

Tuesday, July 12, 2011
किडे-magnet
टीप: खूप दिवसांनी ह्या ब्लॉगवर काहीतरी लिहिलं आहे कोणीतरी ..म्हणून आशेने, उत्साहाने किंवा उत्सुकतेने वाचायला जाणार असाल.. तर माफ करा.. इथे तुमचा फार कायच्या काय मोठा भ्रमनिरास होईल!
आयुष्यात काही काही गोष्टी फार उशिरा जाणवतात, लक्षात येतात.." श्या, आपण हे करायला हवं होतं" असं वाटतं ..पण तोवर फार उशीर झालेला असतो.. तर मला अचानक जाणवलेली गोष्ट म्हणजे मी जीवशास्त्रज्ञ बनायला हवे होते.. त्यातही entomologist व्हायला हवे होते.. परवा मलेरिया झाल्यावर काही करण्यासारखं नव्हतं म्हणून नुसती पंख्याकडे बघत पडून होते.. तेव्हा जाणवलं .. आपण चुकीच्या क्षेत्रात आलो राव.. किडूक-मिडूक काहीतरी करत बसण्यापेक्षा किड्यांचा अभ्यास करायला हवा होता.. ह्याला आता खूप कारणं आहेत..
१. मला किडे-माश्या-झुरळं-पाली कशाचीच भीती वाटत नाही.. आणि कधी तसं pretendही केलं नाही.. नाही म्हणायला एक-दोनदा झुरळ पाहून किंचाळून चांगल्या दिसणाऱ्या मुलाजवळ सरकायचा चान्स होता.. पण ते ध्यान झुरळ-पालीला घाबरतं बघून मग विचार बदलला...
आपण जोवर काही करत नाही तोवर आपल्या वाटेलाही न जाणाऱ्या बिचाऱ्या त्या मुक्या प्राण्यांना घाबरण्यासारखं काय आहे? काहींना किळस येते ते ठीक आहे .. पण मला तर अनेक माणसांचीही किळस येते मग बिचाऱ्या किड्यांच ते काय नवीन?
२. आणि दुसरं कारण म्हणजे मी रोज स्वच्छ अंघोळ करत असले .. व्यवस्थित कपडे घालत असले तरी का कोण जाणे कुठलेही किडे माझ्याकडे येतात.. कदाचित त्यांना सुरक्षित वगैरे वाटत असेल कारण मी डास सोडून कोणत्याही किड्याला कधी मारलं नाहीये.. लहान असताना मी कधी चतुराच्या शेपटीला दोरा बांधून हेलीकॉप्टर-हेलिकॉप्टर खेळले नाहीये.. कधीच काजव्यांना काडेपेटीत बंद करून ठेवलं नाही.. माझा भाऊ करायचा.. त्याला काजव्यांचा torch बनवायचा होता..
मी कधी सुया पकडल्या नाहीत.. म्हणजे पकडल्या.. पण सुयांचं कलेक्शन नाही केलं.. मी कधी फुलपाखरं नाही पकडली.. त्याना observe नक्की केलं.. त्याच्याचवरून तिसरं कारण..
३. पाचवीत असताना शाळेतल्या विज्ञान प्रदर्शनात मी रेशमाच्या किड्यांची lifecycle दाखवली होती.. अगदी अळ्या-कोश- पाखरं सगळ्या stages.. मी तुतीच्या पानांचा भडीमार केला होता त्यांवर.. तेव्हा मी ठरवलं होतं की फुलपाखरं बनवायची अशी खूप.. आणि मग ती पाळायची.. ती मेली की एका काचेच्या पेटीत बंद करायची.. म्हणजे खोट्या फुलावर बसलेली वगैरे.. आणि मग ती विकायची.. पण तेव्हा आई म्हणाली की रेशीम खूप महाग असतं so माझा plan बदलला आणि मी ठरवलं की रेशीम-उद्योग करायचा..पण तो plan ही काही अपरिहार्य कारणाने बदलला.. (कारण अपरिहार्य असलं की भारी वाटतं ना..) तर लहानपणापासून ते गुण होते माझ्यात कीटक-शास्त्रात नाव कमवायचे.. पण झेप घेण्याआधीच तो दिवा कोणीतरी बंद केला..
आता पुढचा एक paragraph नका वाचू.. म्हणजे वाचाल.. पण मग नका म्हणू की आधीच नव्हतं सांगितलं.. तसं तर ते ब्लॉगपोस्टच्या सुरुवातीलाच सांगितलं आहे..
४. अर्चना नावाची एक मुलगी माझ्या बाजूच्या रांगेत बसायची शाळेत आठवीत .. तिचं नाव सांगायची खरं गरज नाहीये.. पण आता ह्या संदर्भात आहे म्हणून सांगायलाच हवं..मला मुळी म्हणजे मुळ्ळीच नाही आवडायची ती.. तिच्या केसात एक लाख प्राणी होते.. "उ" हे नाव नाही आवडत मला.. तर तिच्यामुळे आणि तिच्याबद्द्द्लच्या gossip मुळे मला ह्या प्राण्याबद्दल इतकी माहिती झाली होती.. म्हणजे तो प्राणी ७ अंडी घालतो ह्यावर तसा विश्वास नसता बसला.. पण तिला बघून बसायचा.. ७-४९- पुढे असं progression जाणवायचं तिच्याकडे बघितल्यावर.. आमच्या आयांनी सांगितलं होतं तिच्याजवळ बसू नका जास्त म्हणून.. तेव्हा एखाद-दोन आठवडे तिच्याबद्दल सहानभूती निर्माण झाली होती मला.. तेव्हा वाटायचं, काहीतरी औषध शोधायला हव.. किती मुलींची लहानपण एकटी पडत असतील.. पण मग लगेच विचार आला की मी होईन ही काहीतरी अशी.. मग मला पुढे कोणीतरी विचारेल "हाय.. काय करतेस तू हल्ली?.. "मी लायसील मध्ये काम करते" म्हणायला नाही चांगलं वाटणार ना.. म्हणजे अश्या सांगायला awkward ठिकाणी काम करणाऱ्या लोकांबद्दल मला आदर आहे.. पण कायम गम्मत वाटते.. उदाहरणार्थ.. २ मित्र खूप दिवसांनी भेटतात..
dude1: hey..
dude2: hi..
dude1: so wassap?
dude2: nothing much.. tell me about u man..
dude1: life rocks at Dell..
dude2: dell.. oh thats gr8!
dude1: hey whr r u working?
dude2: uhh.. stayfree..
dude1: oh.. thats..
dude2: i know!
5. मला किड्यांबद्दल बरेच जोक वगैरे पण माहित्येत.. आणि म्हणतातच ना "जेव्हा तुम्ही तुमच्या profession बद्दल जोक करू शकता तेव्हा तुम्ही खरे रुळलेले असता"
उदाहरणार्थ: एक मुलगा: सफरचंद खातानाची सर्वात घाण मोमेंट कोणती असते?
दुसरा मुलगा: कोणती?
पहिला मुलगा: जेव्हा तू सफरचंदाचा चावा घेतोस आणि हातातल्या सफरचंदात अर्धी अळी तडफडताना दिसते..
(पाचव्या कारणाला काही अर्थ नव्हता.. तिसऱ्या कारणात अळ्या लिहिल्यावरचं मला हा जोक आठवला होता आणि सांगायचा होता.. पण असा मधेच कसा घालणार म्हणून पाचवं कारण)
तर डास सोडून कोणत्याही किड्याचा मी द्वेष करत नाही.. डास मात्र डोक्यात जातो.. आणि तो पृथ्वीवरून नामशेष झाल्यास जीवनचक्र थांबून प्रलय येतील अश्यातलाही भाग नाहीये.. त्यामुळे तो पृथ्वीवरून नामशेष व्हावा असं मला मनापासून वाटतं.. मी करोडपती असते तर मी कासव-छाप आणि good knight ला वगैरे फंड पुरवले असते.. अरे चावतो काय. वरून गुणगुणतो काय ..निर्लज्ज प्राणी.. किड्यांच्या नावावर कलंक आहे.. त्या चट्टेरीपट्टेरी डाशीणीने मला मलेरीया द्यावा.. blood sucking b!
डासांनी मला त्रास दिला म्हणून मला राग आहे असं काही नाही पण.. मला बाकीही किड्यांनी दिलाय त्रास.. म्हणजे मला दोनदा मधमाशी चावल्ये.. एकदा एक unidentified हिरवी अळी मानेला फक्त लागली होती आणि माझा double हनुमान झाला होता.. एकदा मला काजवा चावला होता.. मुंग्या तर असंख्य वेळेला चावल्यात.. पण म्हणून मला त्यांच्याबद्द्ल राग नाहीये.. मीच दिला असेल त्रास बिचाऱ्यांना.. गावाला गेल्यावरही काहीतरी वेगळेच किडे माझ्या आजूबाजूला असतात म्हणून मला किडा-magnet म्हणते माझी बहिण..
मध्ये एकदा ह्याच अश्या काहीतरी विषयावर बोलताना मी अमोलला अर्धा तास गोष्ट बनवून सांगितली होती.. "तुलाच का इतके डास चावतात?" ह्या प्रश्नाला उत्तर म्हणून!.. त्याचा काही भाग इथे देत आहे..
"अरे मी गेल्या जन्मात entomologist होते.. (entomologist हा शब्द मला GRE चा अभ्यास करताना कळला होता.. abase,abash,abate इतकाच तो लक्षात राहिला ..असतं एकेका शब्दाचं भाग्य) माझी फार मोठी प्रयोगशाळा होती.. आणि महत्वाचं म्हणजे मी मुलगी नव्हते.. मुलगा होते..( हे एक निश्चित आहे.. गोष्ट खोटी असली तरी मी मुलगाच होते.. दर जन्मात मुलीने मुलगीच असावं असं कुठे लिहिलं आहे?) तर मी अनेक निरनिराळे प्रयोग करत असे.. डासांचा वैद्यकशास्त्रात उपयोग करून घेण्याचा माझा फार मोठा शोध चालू होता.. I was Mr. Know-it-all-about-डास... एक दिवस एक big shot माझ्याकडे आला आणि म्हणाला मला तुझा formula हवाय.. मी तुला २५ कोटी देईन.. त्या काळात २५ कोटी म्हणजे लै होते.. पण मी माझ्या डासांच्या प्रेमापोटी स्पष्ट नकार दिला.. पण तो शेवटी व्हिलन .. तो कसला ऐकतोय.. त्याने डांबरटाने माझ्या नकळत एक सुंदर सेक्रेटरी पाठवली .. मी शेवटी पुरुषच! भाळलो तिच्यावर.. आणि ती सुंदर बाईच.. काढला माझ्याकडून फॉर्म्युला.. पण हाय रे दैवा.. बावळट ती.. चौथं आणि आठवं पान तिने नेलंच नाही.. आणि उरलेल्या मिश्रणातून डास मारायचं रसायन तयार झालं..मी खूप प्रयत्न केला डासांना वाचवायचा.. पण त्या big shot ने माझ्याविरुद्ध कट रचला.. दुनिया मेरी आवाज सुनती उसके पहले ही उसने मेरी आवाज हमेशा हमेशा के लिये बंद कर दी.. डासांना वाटलं मी त्यांना दगा दिला आणि आजतागायत ते माझ्यावर सूड घेतायत.. the end"
लिहिण्यासारखं अजून खूप आहे.. आणि आपण लिहूया एकदा.. तशी अजून वेळ गेली नाहीये.. काहीतरी करता येईल कीटकशास्त्रात.. (कीचकवध कोणी पाहिलं आहे कां? मला अचानक आठवलं कीटक म्हंटल्यावर) तर.. तशी अजून वेळ गेली नाहीये.. काहीतरी करता येईल कीटकशास्त्रात.. कारण तसे अंगात किडे पहिल्यापासूनच आहेत.. किडे करायची हौस ही आहेच!

Sunday, January 30, 2011
पत्रिका
काही मुलं शाळेत असताना कायच्या काय हुशार असतात.. एकदा का शाळेतुन बाहेर पडली की पुढे कुठे हरवुन जातात कळत नाहीत.. ब-याचश्या high school starsचं असंच काहीसं होतं.. पण केतकी अशी नव्हती.. मेरिट होल्डर, ह्या-त्या अश्या ४-५ स्कॉलरशिप्स, भारीतल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधे अॅडमिशन.. तिच्यावेळेपर्यंत मुलींनी इंजिनीअरींगला जायचा ट्रेण्ड नव्ह्ता इतका... मोजुन३-४ मुली असतील फक्त तिच्याबरोबर.. पण तिथेही चमकली होती ती.. मुलं एकतर लेक्चरर्ससोबत पॉप्युलर असतात नाहीतर वर्गातल्या इतर मुलांबरोबर.. दोन्हीकडे स्थान टिकवणं जरा कठीण असतं.. पण तिला तेही जमायचं..
बरं.. गायची पण छान.. बोलायला तर इतकी मधाळ.. कॅम्पस इंटरव्ह्युमधे २ ठिकाणी सिलेक्शन झाल्यावर तिने ठरवलं.. मास्टर्स करायला हवं.. म्हणुन अजुन भारीतल्या कॉलेजमधुन ती पुढे शिकायला गेली.. तिथेही सेमिनार्स आणि पेपर्समधे चमकली... १-२ महिन्यांतुन एकदा कुठल्याश्या NGOसोबत काम करायची... सुंदर लिहायची, गाढा व्यासंग वगैरे... लईच अशक्य मुलगी, केतकी म्हणजे! आदर्श अगदी सगळ्याच बाबतीत... छान जॉब मिळाला, तिथेही उत्तम परफॉर्मन्स देत होती.. मग घरच्यांनी लग्नाबद्दल विचारलं... तिने लाजुन हो म्हंटलं..
आई-बाबा आजुबाजुच्यांना, नातेवाईकांना सांगायला लागले.. "कोणी असेल तर सांगा हं.. केतकीसाठी बघतोय आता"... केतकीची एक आवडती काकू होती.. ती आली एक दिवस एका उमद्या मुलाचं स्थळ घेउन.. "अमेरिकेत असतो, अगदी गुणाचा आहे अगं.. आई-वडील डॉक्टर आहेत..पुण्यात प्रभात रोडवर घर..." केतकीच्या आदर्शपणाला स्पर्धा असणारं आदर्श स्थळ आलं होतं.. "अगं केट्या.. पत्रिका आहे ना तुझी? मुलाकडच्यांना पत्रिका बघायच्ये.. पत्रिका जुळली तरंच पुढे जातील म्हणालेत".. केतकीने आई-बाबांकडे पाहिलं.. आई-बाबांनी काकुकडे... "वाटलंच होतं... काही नाही.. उद्या येत्येस माझ्याबरोबर तू.. माझ्या ओळखीचे आहेत एक गुरुजी.. दाखवुनपण घेउ आपण"
गुरुजींकडे जाताना केतकीने अचानक गाडी थांबवली.. "काकू.. गरज आहे का गं खरंच ह्याची? माझा नाहीये विश्वास अश्या कश्यावर.. शेकडो मैलांवरचे ग्रह-तारे का ठरवणारेत माझ्या आयुष्यात काय होणार ते? मी जन्माला आले तेव्हाच्या ग्रह-ता-यांच्या स्थितीचा आणि माझ्या आत्ताच्या आयुष्याचा काय संबंध? पत्रिका बघायची तर बघा म्हणावं.. आपण दुसरा मुलगा बघु.."
काकुने तिच्याकडे रागाने पाहिलं.. "तुझा विश्वास नाही नं? नको ठेवु मग.. पण पत्रिका बनवल्याने, पाहिल्याने काही नुकसान होणारे का? जुळत असेल तर इतकं चांगलं स्थळ नाही का मिळणारे केट्या? आणि नसुदे विश्वास.. पण इतकी वर्ष चालत आलेलं शास्त्र म्हणजे काहीतरी तथ्य असणारच ना... माझ्या अल्पमतीला इतकंच कळतं की चंद्रामुळे येणारी भरती-ओहोटी इतक्या प्रचंड महासागरांना चुकत नाही.. सूर्याच्या गुरुत्वाकर्षणापलीकडे महाकाय पृथ्वीही जाऊ शकत नाही.. तर आपल्यासारख्या चिलटांची काय दशा?"
केतकीने गाडी सुरु करत पुन्हा काकुकडे पाहिलं.. " महान आहेस तू काकू... तुझ्याशी वाद घालण्यापेक्षा पत्रिका करुन घेउ आपण"
पत्रिका करुन झाल्यावर दोघी बसल्या गुरुजींसमोर.. "चांगली आहे...." गुरुजी सांगायला लागले.. बाकी गोष्टींमधे, कोणत्या स्थानात कोण आहे आणि कोणाचं बळ किती आहे त्यात केतकीला काही रस नव्हता..."करिअरबद्दल काय आहे?" तिने त्यांना जवळ्जवळ अडवतच विचारलं.. कितीही विश्वास नाही- विश्वास नाही म्हंटलं तरी भविष्यात डोकावुन पाहायची उत्सुकता असणारच ना शेवटी...ते खरं असो वा नसो! गुरुजी पत्रिकेत बघत म्हणाले "ठीक आहे".. केतकी जरा ओरडलीच "ठीक?.. फक्त ठीक? ".. गुरुजींनी तिला मग परत पत्रिका समजावयला घेतली...
गाडीत येउन बसल्यावर ती तणतणायला लागली.. "काकू.. असं काय हे? तू बघत्येस.. मी इतकं काम करते.. इतकं छान चालुये सगळं.. आणि म्हणे ठीक फक्त? काही विशेष नसणार?? शक्य आहे का? मी असं कोणासमोर नव्हते बोलले पण काकू खुप मोठं व्हायचं आहे गं मला.. खुप ब्राईट करिअर असेल असं वाटत होतं मला पत्रिकेत.. चाळीशीपर्यंत कारकुनासारखं रडतखडत विकेण्डची वाट बघत पाट्या टाकायच्या आणि मग व्हीआरेस घ्यायची असं करिअर नकोय मला.. नाहीये माझा विश्वास यावर.. मी घडवणारे भारी करिअर"
.. काकू फक्त म्हणाली "नाहीये ना विश्वास.. नको करुन घेउन मग त्रास.. अगं पत्रिका जुळत्ये ना त्या मुलाशी.. चांगली बाजु बघ ना"
दुस-यादिवशी ऑफिसमधे गेल्यावर पुर्णवेळ त्याच विचारात होती.. "नाहीये माझा विश्वास.. नाही होणारे असं काही" म्हणत स्वतःला समजावत काम करत राहिली.. पण तरीही लक्ष लागत नव्हतं कामात तिचं..दोन दिवसात बातमी आली एका प्रोजेक्टसाठी तिच्याबरोबरच्या मुलाला अमेरिकेत पाठवताय्त.. ती तडक कारण विचारायला गेली.. "मी का नाही? तो का?".. " अगं, मुलगी आहेस तू.. एकटी का जाणारेस? आणि वरुन मला कळलं लग्नाचं बघताय्त तुझं.. मग तुझ्यात इतकी इन्व्हेस्टमेंट करणं वर्थ आहे का कंपनीने.. तू लग्न करुन गेलीस तर?" इतकं डायरेक्ट उत्तर ऐकल्यावर तिच्याकडे बोलायला काहीच उरलं नाही... "खरंच नाहीये का माझ्या करिअरमधे काहीच?" हा प्रश्न डोकं खात बसला तिच..
आदर्श मुलाशी लग्न ठरलं तिचं.. आता लग्न करुन अमेरिकेत जायचं.. जॉब सोडला इथला.. लग्न करुन तिथे गेली... "आपल्या घराण्यात कोणा बाईला नोकरी करायची गरज नाहीये.. शिकायचं तर शिक ना पुढे... आमचा विरोध नाही नोकरीला, पण अगदी घरादाराला वा-यावर सोडुन नोकरी नाही केली तरी चालणारे एवढंच...वेळ घालवायला कर काहीतरी हवंतर" असं सासुबाई म्हणाल्यावर तर तिला धक्काच बसला होता...पण तरीही तिने हार मानली नव्हती.. इथे-तिथे प्रयत्न करत होती.. पण काही ना काही कारणाने मधेच परत मागे फिरायची वेळ यायची... सासुबाईंची बोलणी, नव-याची बदली, २ बाळंतपणं आणि सतत काम करताना ऐकु येणारी आकाशवाणी "काही विशेष नाही.. ठीकच करिअर आहे".. मनापासुन काहीतरी करायला जावं आणि शेवटच्या क्षणी सगळं आठवावं.. "मी इतका वेळ देत्ये कामाला.. सगळ्यांचा विरोध पत्करुन हे करत्ये.. पण रिझल्ट्स येणारेत का चांगले.. आणि आले तरी मला रिटर्नस मिळणारेत का?" सततचा डोक्याला त्रास.. शेवटी एकदा नव-याने विचारलं.. " Do we really need all these pains? just leave it.."
चाळीशीपर्यंत पाट्या टाकायचं कामही नाही केलं मग तिने.."मुलींसाठी सोडलं करिअर" असं पुढे अनेक वर्ष सांगायची मग ती... मधे भारतात आली होती तेव्हा काकुकडे गेली होती.. "काकू...माझ्या पोरीसाठी बघायच्येत आता मुलं.." काकू हसत म्हणाली "पत्रिका नसेलच केलेली ना? मॉ-ड-र-न लोक तुम्ही.. म्हणा हल्ली कोण बघतं आहे? असु दे हो नसली तरी चालेल" ..केतकी म्हणाली "आणि कोणाला हवी असेल तरी नाही बनवणारे मी पत्रिका.. पत्रिका बनवली, पाहिली आणि माझ्या करिअरचं काय झालं पाहिलंस ना तू? पत्रिका बघायचा हट्ट नसता धरला तर असं कधीच झालं नसतं.. पत्रिकेमुळे झालं हे सगळं.. नाहीतर सगळं सुरळीत झालं असतं"
काकू परत हसली "वेडे.. काय नाहीये मग आता सुरळीत? आणि पत्रिका बघितल्याने तुझं करिअर बुडलं असं नाहिये केतकी... तुझ्या नियतीत उत्तम करिअरपेक्षा उत्तम नव-याला जास्त झुकतं माप होतं... ती नियती प्रत्यक्षात यायचं कारण पत्रिका बनली इतकंच.. त्याशिवाय कोण अडवणार होतं तुला? चांगल्यासाठीच घडलं की ते.. मुलींना आई मिळाली जास्तवेळ.. आता त्या तुला अभिमान वाटेल असं काम करताय्तंच ना? केतक्या... पत्रिका पाहिल्याने करिअर नाही संपलं तुझं.. करिअर संपणारच होतं, नियतीने त्याला कारण म्हणुन तुला पत्रिका दाखवली इतकंच.. शेवटी तिच्या मनात आहे तेच घडणार, मग त्याला कारण आपलं कर्म असो किंवा शेकडो मैलांवरच्या ग्रहता-यांचं कर्तव्य "
(काल्पनिक आहे हे.. आणि पत्रिका आणि कुंडल्याबद्दल माझा stand हाच आहे असंही नाही.. I am a convenient believer)

Friday, December 10, 2010
Long Drive
त्याच्या थरथरत्या हातावर तिने तिचा हात ठेवला. त्याने तो हात झिडकारला आणि गाडीचं दार उघडुन बाहेर पडला. तिला कळलंच नाही आता काय करावं ते.. डोक्याला हात लावुन काही काळ ती तशीच बसुन राहिली. रोहित जास्त लांब नव्हता, गाडीच्या पलीकडे उभा असलेला कळत होता. अंधारामुळे दिसत नसला स्पष्ट, तरी गाड्यांच्या उजेडाच्या खुणा त्याच्या आकृतीवर दिसत होत्या. ती गाडीतुन बाहेर येत त्याच्या मागे येउन उभी राहिली...
"रोहित.."
त्याने मागेही वळुन पाहिलं नाही. तसाच वर आकाशात बघत उभा राहिला..
"रोहित.. मला माफ कर प्लीज.. मलाच नाही कळलं नक्की असं का झालं ते.. मुद्दाम नाही रे"
रोहित मागे वळला... ती तशीच उभी राहिली तिथे..
"जा गाडीत जाउन बस... सोडतो तुला घरी"
दोघंही गाडीत काहीच बोलत नव्हते. वायपर्सचा काय तितका आवाज चालु होता. रस्त्यावरच्या दिव्यांचे उजेड आता त्याच्या चेह-यावर दिसत होते. मधुनच वायपर्सची सावली, मधल्या झाडांची सावली.. दिव्याच्या अंतरानुसार काचेवरच्या थेंबांची बदलत्या आकारांची सावली. ती रोहितकडे बघत बसली.. रोहितचं नाक जरा वाकडं आहे हे तिला आत्ता जाणवत होतं. ती खिडकीतुन बाहेर बघायला लागली.
अनिकेतचा आवडता खेळ होता हा, उजेड-सावलीचा...अश्या पावसाळी संध्याकाळी अनिकेत तिला गाडी चालवायला सांगायचा आणि मग कित्तीतरी वेळ तिच्या चेह-यावर बदलणा-या सावल्या बघत बसायचा... "आयला.. तुझे डोळे काळे नाहीयेत अमु.. उजेड आला त्यावर की पिंगे दिसायला लागतात.." हा साक्षात्कार त्याला अश्याच एखाद्या वेळी कधीतरी झाला होता. त्यादिवशी परत येताना, अनिकेत मधेच म्हणाला होता, "अमु.. मला नकोय पिंगी बायको".. आणि तिने लक्ष नव्हतं दिलं.. मग खूप वेळाने ती म्हणाली होती "आमच्याकडेही घारा-गोराच नवरा हवाय माझ्यासाठी.. तू नाहीच चालणार". अनिकेत हसला होता त्यावर, ती नाही. रोहितच्या डोळ्यांवर उजेड आला तरी त्याचे डोळे घारेच दिसतात हे जाणवलं अमृताला.
विचार करत असताना अमृता रोहितकडे एकटक बघत्ये हे रोहितला जाणवलं, पण तो काहीच बोलला नाही. त्याने फक्त एकदा तिच्याकडे पाहिलं. किती शांत होतं सगळं... FM नाही, एखादी CD नाही. म्हणजे ह्या परिस्थितीत कोणीही नॉर्मल माणुस गाणी नाही ऐकणार... पण अनिकेत ऐकायचा.. गाडीत शिरल्यावर करायचं पहिलं काम म्हणजे गाणी सुरु करा, त्यानंतर तो अमृतासाठी दार उघडायचा.. गाणी ऐकणं सर्वात महत्वाचं.. "गाडीत ना अम्या, पेट्रोल नसेल तरी चालेल गं.. ८-१० तरी सीड्या हव्या..ए नवीन जॅसन म्रॅझ ऐकलं का?" म्हणुन तो नवीन आणलेली सीडी लावायचा. न ठरवता random गाणी ऐकता येतात म्हणुन कधीकधी तो FM लावायचा. लोणावळ्याच्या सिंहगड कॉलेजच्या भागात पुणे आणि मुंबई दोन्हीकडची रेडिओ स्टेशन ओव्हरलॅप होतात तिथे थांबायला आवडायचं त्याला. टॉर्चर असायचा तो प्रकार पण त्याला आवडायचा. काहीही आवडु शकतं अनिकेतला... काहीही आवडायचं अनिकेतला! रोहितच्या गाडीत एकही सीडी नव्हती. अमृताला खुप आश्चर्य वाटलं होतं संध्याकाळी ती गाडीत बसली तेव्हा...
संध्याकाळी फोन केला होता रोहितने "लॉन्ग ड्राईव्हवर येणार का?".. तिने नाही म्हणाल्यावर "का गं?" साठीही तिच्याकडे उत्तर नव्हतं.. " come on..पुढच्या महिन्यात साखरपुडा आला आता.. भेटलीच नाहीस तर कसं चालेल अमृता? चल यार.. परत आठवडाभर हार्डली भेटू शकतो आपण.. चल की". ती शेवटी हो म्हणाली, तो तिला घ्यायला येईपर्यंत ती गेटजवळ जाउन उभी राहिली. अनिकेत तिला तिथुनच पिक-अप करायचा ती कॉलेजमधे होती तेव्हा... तिला सोडुन मग अनिकेत पुढे कामावर जायचा, एकत्र जाण्या-येण्यामुळेच त्यांची ओळख वाढत गेली होती. दिवसातला तो सकाळचा थोडावेळ बेस्ट असायचा त्यांच्यासाठी. मग काहीवेळा लवकर कॉलेज सुटत असुन अमृता जास्तवेळ लायब्ररीत बसायची म्हणजे येतानाही अनिकेतबरोबर येता येईल. "आपलं लग्न झाल्यावर आपण ना गाडीतच राहत जाउयात का अमु? म्हणजे हवं तर मोठी गाडी घेउयात.." असे weird प्रश्न विचारताना, अश्या काहीही कल्पना करताना अनिकेतचा चेहरा खुप उजळायचा. Xyloत राहण्याएवढी नसली तरी बरीच जागा असते की... अमृता मागे वळुन बघत होती गाडीत, रोहितने तिच्याकडे पाहिलं, "काय झालं आता?"..अमृताने फक्त नाही म्हणुन मान हलवली.
एक दिवस असंच अनिकेतनी विचारलं होतं "अमु चल गं, जाऊयात ना लांब कुठेतरी फिरायला.. येतेस का?" तिने आळशीपणा केला होता. अनिकेत मग रागावुन एकटाच निघाला होता. एक्स्प्रेसवे वर असंच लोणावळ्यापर्यंत जाऊन यायला... फाटलेला टायर.. पुढचा ट्रक, मागुन येणारी भरधाव गाडी.... अनिकेत दिसलाही नाही नीट कोणाला...त्यानंतर ती कायमच हे सगळं टाळत आलेली होती.. Long drives नको, Express way नको... गाड्या नको.. प्रवास नको.. आज खुप कष्ट करुन बाहेर पडली होती ह्या सगळ्या "नको" मधुन... चांदणी चौकातच म्हणाली होती ती रोहितला.. "फिरुया परत आता?"...
रोहित पुढे जात राहिला.."चल गं अमृता.. एवढं काय?.. बोल ना काहीतरी.." असं म्हणुन रोहित स्वतःच गोष्ट सांगत बसला होता.. गुंग झाला होता लहानपणच्या कोणत्यातरी आठवणीत.. आठवणीच्या वेगानेच गाडी चालवायच्या प्रयत्नात.. इतक्यात पलीकडचा एक ट्रक अचानक वळला पेट्रोल पंपासाठी.. आणि धाडकन ह्याच्या गाडीसमोर आला.. रोहितने पटकन गाडी सांभाळायचा प्रयत्न केला.. ती जोरात ओरडली "अनिकेत... जपुन ".. रोहितने गाडी सांभाळली पण हे पुढचं त्याला सांभाळता येईना.. गाडी बाजुला लावुन तसाच थरथरत बसला...
गाडीला ब्रेक लागल्यावर ती पुन्हा भानावर आली. त्यांचा गेटपर्यंत येउन थांबले होते दोघं. तिनी दार उघडलं आणि बाहेर येउन उभी राहिली. रोहित तिच्याकडे बघत नव्हताच.
"रोहित.. I am sorry"
"ठीक आहे.. उद्या संध्याकाळी तयार रहा.. येईन आजच्याच वेळेला.."
तिला काहीच कळेना.. रोहितने तिच्याकडे पाहिलं... "उद्या येशिल long drive ला? ... माझ्याबरोबर...?"
I 'll drive out memories, the evening air keeping me awake,
those I leave behind only make room for more to be made...

Subscribe to:
Posts (Atom)